आयपीएलच्या 66 व्या सामन्यात लखनौने प्रथम फलंदाजी करत केकेआरसमोर ठेवलं 211 धावांचं आव्हान क्विंटन डी कॉकने यावेळी केला नवा रेकॉर्ड आयपीएल 2022 मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली आहे. क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत ठोकल्या नाबाद 140 धावा यावेळी क्विंटन डी कॉकनं केएल राहुलसोबत दमदार भागिदारी करत ही कामगिरी केली. क्विंटन डी कॉकनं केलेल्या या धावा आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा ठोकणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर यावेळी केएल राहुलनंही 51 चेंडूत नाबाद 68 धावा कुटल्या. त्यामुळे या दोघांची नाबाद 210 धावांची भागिदारी पहिल्या विकेटसाठी झालेली सर्वात मोठी भागिदारी ठरली क्विंटन डी कॉकच्या नाबाद 140 धावांमध्ये 10 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश क्विंटन डी कॉकनं या खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.