कंगना रनौतनं वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली.



सध्या कंगना ही तिच्या धाकड चित्रपटाचं प्रमोशन करत आहे.



धाकड चित्रपटाच्या टीमसोबत कंगना वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेली.



कंगनाला ज्ञानवापी प्रकरणाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला कंगनानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.



कंगनाला जेव्हा ज्ञानवापी प्रकरणाबाबत विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'जसे मथुरेच्या कणा कणामध्ये भगवान कृष्ण आहेत. तसेच जसे अयोध्येच्या कणा कणामध्ये राम आहेत. तसेच काशीच्या कणा कणीमध्ये महादेव आहेत. '



कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



कंगना ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते.



कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते.



कंगनाच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा देखील सोशल मीडियावर होत असते.



कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.