शाहिद कपूरची बहीण आणि पंकज कपूर-सुप्रिया पाठक यांची मुलगी सना आज अभिनेते मयांक पाहवासोबत लग्न करणार आहे.



सना कपूर आणि मयांक पाहवा यांचे लग्न महाबळेश्वरमध्ये होणार आहे.



या लग्नाला कुटुंबातील सदस्यांसह काही बॉलिवूड सेलिब्रिटी, जवळचे मित्रही सहभागी होणार आहेत



पाहवा आणि कपूर हे अनेक वर्षांपासून कौटुंबिक मित्र आहेत.



2015 मध्ये रिलीज झालेल्या विकास बहलच्या 'शानदार' या चित्रपटातून सनाने मोठ्या पडद्यावर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते



या चित्रपटात सनासोबत तिचा भाऊ शाहिद, वडील पंकज कपूर आणि आलिया भट्ट हे देखील मुख्य भूमिकेत दिसले होते.