'बाहुबली' सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.



'बाहुबली' आणि 'साहो'च्या यशानंतर लोक प्रभासच्या 'राधे श्याम'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.



या चित्रपटात प्रभासबरोबर पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत आहे.



या चित्रपटात प्रभासची दोन रूपं पाहायला मिळणार आहेत.



एकात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे तर दुसरी भूमिका रोमियोची असणार आहे.



हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



प्रभासचा हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



(Photo Credit : https://www.facebook.com/ActorPrabhas/photos )