बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ चा आज 32 वा वाढदिवस आहे.

टायगर लहान होता तेव्हा त्याच्या वडीलांनी त्याचं टोपण नाव टायगर असं ठेवलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी टायगरनं त्याचं नाव बदललं.

2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिरोपंती या चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी टायगरच्या फिटनेसनं अनेकांचे लक्ष वेधलं पण काहींनी त्याच्या लूकला ट्रोल केलं.

अनेकांनी त्याला गर्ल लूक आणि पिंक लिप्स लूक असं म्हणत ट्रोल केले होते. पण टायगरनं या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं.

टायगर हा तायक्वॉन्डोमध्ये ब्लॅक बेल्ट विनर आहे. तसेच त्यानं मार्शल आर्टचं देखील ट्रेनिंग घेतलं आहे. त्याच्या बाघी, वॉर, स्टूडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटांमधील टायगरच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

अनेक वेळा टायगरचे नाव अभिनेत्री दिशा पाटणीसोबत जोडले जाते. पण टायगरनं त्याच्या आणि दिशाच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती त्याच्या चाहत्यांना दिलेली नाही.

लवकरच टायगरचे हिरोपंती, गणपत आणि बडे मिया छोटो मिया हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

(photo:tigerjackieshroff/IG)