आलिया भट्टने भूमिका साकारलेला 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.
चित्रपटात आलिया भट्टशिवाय जिम सर्भ आणि शंतनू माहेश्वरी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मात्र या भूमिका त्यांच्याआधी इतर कलाकारांना ऑफर करण्यात आल्या होत्या,
दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत अभिनेत्री दिपीका पादुकोणने अनेक चित्रपट केले, जे गाजले देखील! ज्यात रामलीला, पद्मावत आणि बाजीराव मस्तानी या ब्लॉक बस्टर चित्रपटांचा समावेश आहे. दीपिका या चित्रपटात असेल अशा बातम्या देखील आल्या होत्या
अशी माहिती होती, या चित्रपटात 'गंगूबाई'ची भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शक भन्साळींनी प्रियांका चोप्राशी संपर्क साधला होता.
रिपोर्ट्सनुसार, 'गंगूबाई काठियावाडी'च्या कास्टिंगदरम्यान राणी मुखर्जीचे नाव देखील पुढे आले होते.
रिपोर्ट्सनुसार, जिम सर्भऐवजी नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात पत्रकार 'अमिन फैजी'ची भूमिका साकारणार होता
लोकप्रिय टीव्ही अभिनेता पार्थ या चित्रपटात गंगूबाईच्या प्रियकराची भूमिका साकारणार होता.