कार्तिक आर्यन हा त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो कार्तिक हा शाहिदच्या घरात भाड्याने राहणार आहे. कार्तिक हा शाहिदच्या घरात भाड्याने राहणार आहे. त्याने शाहिदचे जुहू येथील घर भाड्याने घेतलं आहे. शाहिदचा सी-फेसिंग फ्लॅट कार्तिकनं भाड्यानं घेतला आहे. शाहिदने हा जुहूमधील फ्लॅट 2014 मध्ये खरेदी केला होते. कार्कित हा या फ्लॅटचे पहिल्या वर्षाचे भाडे 7.50 लाख रुपये भरणार आहे. कार्तिक आर्यन सध्या वर्सोवा येथील अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने हे अपार्टमेंट 2019 मध्ये 1.60 कोटींना खरेदी केले होते. कार्तिकचा चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. कार्तिक हा त्याच्या शहजादा या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.