मुंबई पोलिसांनी अभिनेत्री राखी सावंतला (Rakhi Sawant) ताब्यात घेतलं आहे.



काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत.



आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे.



राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे.



एका मॉडेलच्या तक्रारीवरुन राखीवर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे



पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करुनही ती हजर राहत नव्हती.



आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.



मुंबईच्या सत्र न्यायालयाने कालच राखी सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता, त्यानंतर आज तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.



राखी सावंत ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.



खीनं काही दिवसांपूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत (Adil Khan Durrani) लग्न केले.