बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.



अमिताभ बच्चन यांनी रियाध एसटी इलेव्हन आणि पॅरिस सेंट जर्मन यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्याला पाहुणे म्हणून हजेरी लावली.



अमिताभ यांनी फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांची भेट घेतली.



फुटबॉलस्टार लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बातचीत केली.



अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते सौदीतील किंग फहद इंटरनॅशनल स्टेडियममध्ये दिसत आहेत.



फोटोला अमिताभ बच्चन यांनी कॅप्शन दिलं, 'रियाधमधली एक संध्याकाळ... क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत. PSG विरुद्ध रियाध सीझन्स.. अविश्वसनीय'



अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत



अमिताभ बच्चन यांच्या आागमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.



काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले.