अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या डंकी (Dunki) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
पठाण आणि जवान या बॅक टू बॅक हिट चित्रपटानंतर आता शाहरुखचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
शाहरुख हा अनेकदा सोशल मीडियावर AskSRK सेशन होस्ट करतो आणि चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देतो.
नुकतेच शाहरुखनं ट्विटरवर AskSRK हे सेशन होस्ट केले. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यानं उत्तरं दिली आहे.
एका नेटकऱ्यानं प्रश्न शाहरुखला विचारला, यावेळी राजकुमार हिरानी सरांनी चित्रपटासाठी तुझ्याशी संपर्क साधला की तू हिरानी सरांशी संपर्क साधला?
नेटकऱ्याच्या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, मी राजकुमार यांच्या घरासमोर तंबू ठोकला होता. तिथेच मी चित्रपटाची गोष्ट ऐकली आणि तिथेच चित्रपट साइन केला. आता तिथेच एडिटिंग चालू आहे!!!
सर, तुम्हाला व्हिसा कधी मिळेल? जर मिळाला नाही तर मला सांगा कारण माझी व्हिसा कंपनी आहे. मी तुम्हाला व्हिसा मिळवून देईल!! असा प्रश्न एका नेटकऱ्यानं विचारला.
शाहरुखनं चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर दिलं, भावा माझ्याकडे पैसे नाहीयेत. नाही तर आलो असतो.
शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
डंकी या चित्रपटात शाहरुखसोबतच विकी कौशल, बोमन ईरानी, तापसी पन्नू या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.