निकाराग्वाची 23 वर्षाची शेनिस पॅलासिओस मिस युनिव्हर्स 2023 या स्पर्धेची विजेती ठरली आहे.
2023 मिस युनिव्हर्स स्पर्धा शनिवारी पार पडली. या स्पर्धेच्या विजेतीची घोषणा झाल्यानंतर मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन शेनिस पॅलासिओसला दिला. आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.
मिस युनिव्हर्स 2022 आर बॉनी गॅब्रिएलने तिचा क्राऊन शेनिस पॅलासिओसला दिला.
आता जगभरातून शेनिस पॅलासिओसचं कौतुक होत आहे.
स्पर्धेमधील अंतिम फेरीमध्ये स्पर्धेच्या फायनलिस्टला प्रश्न विचारण्यात आला की, जर तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या शूजमध्ये एक वर्ष जगण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाची निवड कराल आणि का?.
मिस निकाराग्वा शेनिस पॅलासिओसने अंतिम फेरीमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर हे सर्वात वेगळे होते.
शेनिस पॅलासिओसने उत्तर देताना मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांच्या नावाचा उल्लेख केला.
मिस युनिव्हर्स स्पर्धेचे हे विजेतेपद पटकावणारी शेनिस पॅलासिओस ही निकाराग्वाची पहिली महिला ठरली आहे.
शेनिसला मिस युनिव्हर्स स्पर्धेचा क्राऊन परिधान करताच ती भावूक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.
90 देशांमधील स्पर्धकांनी यंदा देखील मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभाग घेतला होता.