शाहरुख खान हा पठाण या चित्रपटाचं प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे. शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीनं उत्तरं देत आहे. एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या मन्नत या बंगल्यासमोरील फोटो शेअर करुन त्याला विचारले, वाट पाहत होतो, तू आला का नाही?' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अरे, तेव्हा मी बेडवर चिल करत होतो.' 'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' असा प्रश्न देखील एका युझरनं शाहरुखला विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं उत्तर दिलं, 'चित्रपट बघून घे, गर्लफ्रेंड बनवायला अख्खं आयुष्य आहे.' दुसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, तुम्ही कपिल शर्मामध्ये यावेळी येणार आहात का?' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'भावा, मी आता चित्रपटगृहात येणार आहेत. तिथेच भेटूयात. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाणमधून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.