बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमचा 'पठाण' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'पठाण' या सिनेमाने एसएस राजामौलीच्या 'बाहुबली 2'लादेखील मागे टाकलं आहे. 'पठाण' या सिनेमाने जगभरात 1029 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात 'पठाण'ने 529.44 कोटींची कमाई केली आहे. 'पठाण' पुढे कार्तिक आणि खिलाडी कुमार आपली जादू दाखवण्यात कमी पडले. 'पठाण' या सिनेमाचं कथानक, कलाकारांच्या अभिनयासह सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'पठाण' सिनेमा रिलीज होऊन 38 दिवस पूर्ण झाले असले तरीदेखील जगभरात या सिनेमाची क्रेझ कायम आहे. शाहरुखच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.