बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी (2 मार्च) रात्री दोन तरुणांनी या बंगल्याची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. 'मन्नत'ची भिंत तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भिंत तोडणारे तरुण गुजरातमधील असून त्यांना त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,19-20 वर्षे वयोगटातील दोन तरुणांना ड्युटीवर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंगल्यात प्रवेश करताना पकडलं आहे. विनापरवाना खासगी मालमत्तेत प्रवेश केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली तेव्हा शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' या सिनेमाचं शूटिंग करत होता. शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जवान' नंतर शाहरुख 'डंकी' या सिनेमात झळकणार आहे.