'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.



'आई कुठे काय करते' या मालिकेत रंजक वळण आलं आहे.



'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती आणि आशुतोष लग्नबंधनात अडकणार आहेत.



अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या.



अभिषेक आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय.



अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं.



देशमुखांच्या घरीच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि लग्नसोहळा पार पडणार आहे.



भगव्या रंगाची पैठणी, कपाळावर मुंडावळ्या, हिरवा चुडा आणि चंद्रकोर असा अरुंधतीचा नववधू लुक आहे.



अरुंधतीच्या व्हिडीओवर खूप गोड आहे नवरी, खूपच सुंदर, आता लग्नाची प्रतीक्षा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.



आशुतोष-अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाची लगबग सुरू झाली आहे.