बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोण सध्या 'पठाण' या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने 'ऑस्कर 2023'मध्ये भारताचे नाव उंचावले आहे. 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे. दीपिकाने पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. दीपिका पादुकोण अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'ऑस्कर 2023'मध्ये दीपिका पादुकोणकडे मोठी जबाबदारी असल्याने चाहते आनंदी झाले आहेत.