बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि पती जीन गुडइनफ आज त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा करत आहेत. प्रीती पती जीन गुडइनफसोबत अमेरिकेत आलिशान घरात राहते. प्रीती झिंटा चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रीती चाहत्यांसोबत तिच्या घराची झलक शेअर करत असते. प्रीतीने फेब्रुवारी 2016 मध्ये जीन गुडइनफशी लग्न केले. त्यानंतर ती त्याच्यासोबत अमेरिकेत राहते. प्रीतीचं अमेरिकेतील घर खूप आलिशान आहे. प्रीतीच्या घरातील किचनही व्हाइट थीमवर सजवण्यात आले आहे. या जोडप्याच्या घराशेजारी बाग आहे.