सुष्मिता आपलं वैयक्तिक आयुष्य नेहमीच तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.



सुष्मिता सेनने चाहत्यांना चिंतेत टाकणारी धक्कादायक बातमी सांगितली.



आपल्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती सुष्मिताने दिली.



यानंतर तिला अँजिओप्लास्टी करावी लागली. सध्या प्रकृती बरी असल्याचे तिने सांगितले.



प्रकृतीबाबतची माहिती देताना तिने वडिलांसोबतचा फोटो शेअर केला.



ज्या लोकांनी मला वेळेवर मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानते, असेही तिने सांगितले.



सुष्मिता सेनची पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.



चाहत्यांनी तिला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.



'आर्या' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले होते.



आर्या या वेबसीरिजचा तिसरा सिझन लवकरच येणार आहे.