तीळगुळाचे लाडू बवण्यासाठी सर्वात आधी तीळ चांगल्याप्रकारे स्वच्छ करुन, निवडून घ्या

यानंतर गॅसवर कढई मध्यम आचेवर ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तीळ टाकून तीन ते चार मिनिटं भाजून घ्या.

तीळाचा रंग बदलल्यावर ते एका भांड्यात काढून घ्या आणि थंड करा.

यानंतर कढईत एक मोठा चमचा भरुन तूप टाकून ते गरम करा

आता यात गुळाचे तुकडे टाका आणि मंद आचेवर गुळ विरघळू द्या

एकदा का गूळ विरघळला की त्यात वेलची पावडर, शेंगदाणे, काजू बदाम टाकून व्यवस्थित एकजीव करा

यानंतर भाजलेले तीळ देखील त्यात टाकून मिश्रण ढवळून एकजीव करा. तिळाचे लाडू बवण्यासाठी गूळ आणि तिळाचं मिश्रण तयार आहे.

गॅस बंद करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला गरम मिश्रणाचेच लाडू वळायचे आहेत.



लाडू वळण्यासाठी हाताला तूप लावून घ्या. एक चमच्यात मिश्रण घेऊन ते तळहातावर घ्या आणि गोल आकाराचे लाडू वळा.