देशभरात विशेषत: उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. यामुळे ह्रदयविकाराचा धोका वाढला आहे.



थंडीमुळे ह्रदयविकाराचा झटका येऊन देशात काही जणांचा मृत्यू झाला आहे.



देशात थंडीमुळे ह्रदयविकाराचा झटका आणि ब्रेनस्ट्रोकमुळे एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही फार चिंताजनक बाब आहे.



त्यामुळे ह्रदयासंबंधित आजार असलेल्या लोकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



हृदयरोग तज्ज्ञाच्या मते, ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी सकाळी चालणे टाळावे.



हृदयविकार आहे अशा लोकांनी त्यांच्या घरातच राहून व्यायाम करावा.



थंड वातावणात पहाटे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर पडू नये. कारण हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो.



दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयाचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज कुमार यांनी विशेषत: वृद्धांनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक टाळावे, असे आवाहन केले आहे.



डॉ.मनोज कुमार यांनी सांगितले की, वृद्ध व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो, पण आजकाल तरुणांमध्येही हा धोका दिसून येतो.



हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी, कमकुवत हृदय असलेल्या, ह्रदयासंबंधिक आजार असणाऱ्या तसेच आजारी व्यक्तींनी हिवाळ्यात सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक करणे टाळणे आवश्यक आहे.



त्याऐवजी घरातच राहून व्यायाम करावा.