पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. सीमा आपल्या प्रेमासाठी पाकिस्तान सोडून भारतात आली. अशातच सोशल मीडियावर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत. यातील एक व्हिडीओ पाकिस्तानमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. ज्यात एक युट्यूबर पाकिस्तानील लोकांनी सीमाविषयी प्रश्न विचारत आहे. सीमाविषयी लोकांनी त्याची मतं दिली आहेत. पाकिस्तानील लोक सीमाला धोकेबाज म्हणत आहेत. सीमा सचिनला पण सोडून देणार, असं त्यांचं म्हणणं आहे. सीमा भारतातून अमेरिकेत जाणार, असं एकाने म्हटलं. तर काही जण सचिनला सीमाविषयी सूचित करत आहेत.