गांजा हा नशेचा एक प्रकार आहे. काही जण मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन करतात. भारतात गांजाचे सेवन आणि विक्री या दोन्हींवर बंदी असली तरी छुप्या पद्धतीने याचा व्यवसाय केला जातो. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये काही लोक घोड्याला जबरदस्ती गांजा ओढायला लावताना दिसत आहेत. गांजाचा प्राण्यांवर काय परिणाम होतो ते जाणून घ्या. कॅनबिस (Cannabis) ला सामान्य भाषेत गांजा म्हणतात. यातून तीन प्रकारच्या अंमली पदार्थांची निर्मिती होते. यातील पहिला प्रकार म्हणजे गांजा, दुसरा भांग आणि तिसरा चरस. गांजाच माणसांप्रमाणे प्राण्यांवरही परिणाम होतो. प्राण्यांवर नशेच्या पदार्थांचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. काही प्राण्यांवर नशेचा प्रभाव काहींवर कमी, तर काहींवर जास्त असू शकतो. गांजाचे THC आणि CBD असे दोन प्रकार आहेत. CBD बऱ्याच बाबतीत प्राण्यांसाठी हानिकारक नाही, परंतु THC हे कुत्रे, मांजर आणि घोडे यांसारख्या इतर अनेक प्राण्यांसाठी विषारी ठरते.