जगभरातील अंतराळ संस्था पृथ्वीसारख्या ग्रहाच्या शोधात आहेत. आता पृथ्वीसारखा दुसरा ग्रह सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. जपानच्या खगोलशास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, पृथ्वीसारखा ग्रह आपल्याच सौरमालेत अस्तित्वात आहे. खगोलशास्त्रज्ञ वर्षानुवर्षे सांगत आहेत की, आपल्या सौरमालेत आठ ऐवजी नऊ ग्रह आहेत. प्लुटोचा ग्रहाचा दर्जा काढून टाकल्यानंतर सूर्यमालेतील ग्रहांची संख्या आठ झाली आहे. त्यानंतर आता जपानी शास्त्रज्ञांच्या या दाव्यानंतर नवव्या ग्रहाचा खरोखरच शोध लावल्याचा दावा केला आहे. जपानी खगोलशास्त्रज्ञांच्या नवीन रिपोर्टनुसार, नववा ग्रह आपल्या सूर्यमालेतच आहे. हा ग्रह क्विपर बेल्टमध्ये लपलेला आहे. सूर्यमालेतील शेवटचा ग्रह नेपच्यून ओलांडला की तिथून क्विपर बेल्ट सुरू होतो. हा पट्टा गोल आकाराचा आहे, जो संपूर्ण सूर्यमालेला घेरतो. जपानी शास्त्रज्ञांनी नवीन ग्रहाचे नाव 'क्विपर बेल्ट प्लॅनेट' (KBP) असं ठेवलं आहे. क्विपर बेल्ट हा ग्रह पृथ्वीपासून 4.5 अब्ज किलोमीटर अंतरावर आहे. तज्ज्ञांच्या मते, 'क्विपर बेल्ट प्लॅनेट' (KBP) पृथ्वीपेक्षा तीनपट मोठा आहे. पण येथील तापमान इतके कमी आहे. जपानमधील ओसाका येथील किंदाई विद्यापीठातील पॅट्रिक सोफिया लिकावाका आणि टोकियोच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने हा अभ्यास केला आहे.