अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि पेन्सिलवेनिया शहरांच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे बऱ्याच गाड्या सकल भागात साचलेल्या पाण्यात अडकल्या आहेत. गाडीतील लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अमेरिकेत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्कसह अमेरिकेतील सर्वच भागात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. हायलँड फॉल्स, ऑरेंज काउंटी आणि न्यूयॉर्कमध्ये अतिवृष्टीमुळे अचानक पूर आला. मॅनहट्टनपासून 40 मैल लांब असलेल्या स्टोनी पॉईंट शहरात पुराचं पाणी दिसून येत आहे. स्टोनी पॉईंट शहरात आलेल्या पुरामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.