महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती



सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारी 1831 रोजी झाला.



महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं.



त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली



सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.



त्यांच्या जन्मगावी नायगावमधे असलेल्या सावित्रीबाईंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आज लोकांची गर्दी पहायला मिळतेय.



नायगावमधील नेवसे वाड्यामधे हे स्मारक आहे



सावित्रीबाई फुलेंचा जन्म त्यांचे वडील खंडोजी नेवसे यांच्या नायगाव मधील या वाड्यात झाला होता.



ही सावित्रीबाई फुले यांच्या घरातील स्वयंपाक खोली आहे.



याच खोलीमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता.



सावित्रीबाई फुले यांच्या घरात धान्य साठविण्यासाठी जमिनीखाली अनेक फुट खोल असलेले भांडारघर...



जमिनीखाली अनेक फुट खोल धान्य साठवण्याची पेव...