एक दिवस अभिनेत्री कतरीना कैफने जान्हवीच्या स्टायलिश लूकवर प्रश्न उपस्थित केले होते. जान्हवी कपूरचा पहिलाच सेनेमा प्रदर्शीत होणार होता त्यावेळी हा प्रकार घडला होता.
एका मुलाखतीदरम्यान कतरीना कैफने जान्हवीच्या जीम शॉर्टवर चिंता व्यक्त केली होती. कतरीनाने म्हटले होते की, मला जान्हवीची खूप चिंता वाटते. कारण ती खूप शॉर्ट परिधान करून जीमला जाते.
कतरीना आणि जान्हवी त्यावेळी एकाच जीममध्ये व्यायाम करत होत्या. कतरीनाच्या या वक्तव्यावर जान्हवीने काही उत्तर दिले नाही परंतु, कपूर कुटुंबातील एका मुलीने याला चांगलेच उत्तर दिले.
अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर याचे उत्तर दिले होते. जान्हवीचे काही फोटो शेअर करत सोनमने लिहिले होते की, नॉर्मल कपड्यात जान्हवी खूप चांगली वाटते.
सोनम कपूर नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. शिवाय अशा मुद्यांवर ती नेहमीच प्रतीक्रीया देत असते. अशातच तिच्या कुटुंबातील व्यक्तिच्या कपड्यांवरून कोणी प्रश्न उपस्थित केला तर ती त्याला उत्तर देणारच.
जान्हवी आपल्या फिटनेसची खूप चाहती असून ती रोज व्यायाम करते. आजही जान्हवी कपूर आपल्या जीम लूक वरून खूप चर्चेत असते.
जान्हवी स्टायलिश जिम वेअरमध्ये जिममध्ये पोहोचते आणि पापाराझी तिची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक दिसत असतात.
फक्त जीम लूकच नाही तर गेल्या एक-दोन वर्षातील जान्हवीचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा खूप उजळले आहे. जान्हवी आता पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वात दिसत आहे.
2022 हे वर्ष जान्हवी कपूरसाठी खूप खास असणार आहे. यावर्षी तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. जान्हवीने 2018 मध्ये चित्रपट सुष्टीत पदार्पण केले आहे.