शरद पवारांनी सातऱ्यात जाऊन थाटात कॉलर उडवली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. उदयनराजे भोसले हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे ओळखले जातात. ते भर सभेत, पत्रकार परिषदेत किंवा एखाद्या कार्यक्रमात थाटात कॉलर उडवतात. उदयनराजेंनी कॉलर उडवताचप्रेक्षकांतून टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतात. उदयनराजे हे नेहमीच बिनधास्त आणि स्टाईलने वावरत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात थाटात कॉलर उडविणारा नेता अशी उदयनराजे यांची ओळख आहे. मात्र याच उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यात जाऊन शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हातांनी कॉलर उडवली आहे. राज्यात महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही क्षणी वाद असलेल्या जागांवर मविआ आपले उमेदवार जाहीर करू शकते. दुसरीकडे सातारा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडली. श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचे कारण देत निवडणुकीतून माघार घेतली आहे.