शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेव यात्रेचा (Yatra) आज मुख्य दिवस आहे. हर हर महादेवच्या जयघोषात हजारो भाविक दाखल हजारो भाविक गडावर दाखल या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाच्या नावानं म्हणजेच शिखर शिंगणापूर या नावानं हा डोंगर प्रचलित झाला आहे. लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात. या कावडीमध्ये महत्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड. कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते. दरवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला यात्रा सुरु ही यात्रा पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. यात्रेसाठी भाविकांची गर्दी वाढतच आहे. या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक शिखर शिंगणापूरमध्ये दाखल होतात.