क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 192 वी जयंती. सावित्रीबाईंचा जन्म नायगावमधील खंडोजी नेवसे यांच्या वाड्यात 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

या वाड्याचे अवशेष शिल्लक राहिले होते. पण आता पुरातत्व विभागाकडून हा वाडा जसा होता तसाच उभारण्यात आला आहे.

खंडोजी नेवसे यांच्याकडे नायगावची पाटीलकी होती. त्या पाटीलकीला साजेसा हा वाडा आहे.

दोन्ही बाजूला दोन माजघरं आणि ही माळी...इथे सावित्रीबाईंचा जन्म झाला.

जाड दगड मातीच्या भिंती आणि त्यातून डोकावणारी सूर्यकिरणे

या वाड्यातील हे स्वयंपाकघर

धान्य साठवण्याचे हे भांडारघर दोन टप्प्यात आहे. यामध्ये वर धान्य साठवण्याच्या कनग्या आहे तर खाली जाते आहे

तर जमिनीखाली 12 फूट खोल धान्य साठवण्याचा पेव असून त्यावर लटकवलेला कंदील आहे.

सावित्रीबाईंचे हे जन्मस्थान अठराव्या शतकातील महाराष्ट्रातील वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.