सातारा जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरु आहे.

महाबळेश्वरमधील तापमान सलग तिसऱ्या दिवशीही खालावलेले आहे.

महाबळेश्वर 9 अंश तर वेण्णालेक परिसरात 7 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे.

आजही काही ठिकाणी दवबिंदू गोठल्याचं पाहायला मिळतं.

पारा घसरल्याने वेण्णालेक, लिंगमळा इथे पहाटेला दवबिंदूचे गोठल्याचं चित्र पाहायला मिळत.

वेण्णालेक परिसरात पर्यटकांना पुन्हा हिमकणांचा अनुभव मिळत आहे.

झाडा झुडपांवर, पाना फुलांवर हिमकण आढळून येत आहेत.

महाबळेश्वर शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे.

या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गसौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळत आहे.