वडूज - खटाव रोडवरील जाधव वस्ती बसला भीषण अपघात झाला. भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी झाडावर आदळली दरम्यान या अपघातामध्ये चालक जागीच ठार झाला आहे. तर या एसटीमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील आठ प्रवासी हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत. तर जे लोक गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्यात येत आहे. तर एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.