सारा तेंडुलकर सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असून तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सारा तेंडुलकरला आतापर्यंत वेस्टर्न लूकमध्ये पाहिलं असेल. परंतु नुकताच तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळाला जवळच्या नातेवाईच्या लग्नात सारा तेंडुलकर पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशात दिसली. केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने आणि हातात लाल बांगड्या घातल्या होत्या. या लग्नात साराने निळ्या आणि लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. या लग्नसोहळ्यातील नंतरच्या इतर कार्यक्रमात साराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. लग्नाला सचिन तेंडुलकरची आई देखील हजर होती. सचिन तेंडुलकरने नववधूवरांना शुभेच्छा दिल्या.