स्टोन आर्ट म्हणजे जणू दगडात प्राण फुकणं हीच कला सुमन दाभोलकर यांनी जपली आहे. नाताळच्या निमित्ताने सुमन यांनी एक सुंदर स्टोन आर्ट केलं आहे. या स्टोन आर्टमध्ये त्यांनी सांता क्लोज साकारला आहे. गावच्या नदीत मिळणाऱ्या दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता हे शिल्प साकारलं आहे. नाताळच्या निमित्ताने सुमन यांनी हे सुंदर आणि आकर्षक शिल्प केलं आहे. राज्यभरात कोरोनाच्या संकटामुळे नव्या नियमाखाली नाताळ सण साजरा झाला. दगडावरील हे सांताक्लॉजचे आकर्षक स्टोन आर्ट पाहण्यासारखं आहे.