भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात Good Governance Day 2021 अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं. ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. आज देखील यानिमित्तानं अटलबिहारी वाजपेयींना देशभरात अभिवादन केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी अटलजींना अभिवादन केलं आहे. वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेश ग्वाल्हेरमध्ये झाला होता 27 मार्च 2015 ला त्यांना 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला.