बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची (Kareena Kapoor) 'कोविड - 19' चाचणी निगेटिव्ह आली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने कोरोनामुक्त झाल्याचे कळवले आहे.

करीना सिने-निर्माते करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती.

त्या पार्टीतच करीनाला कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले गेले.

करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.

या स्टोरीच्या माध्यमातून तिने करिश्मा कपूर, सैफ अली खान आणि मित्रांचे आभार मानले आहेत.