भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव या विजयासह भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा वाढल्या आहेत. ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. भारत आणि वेल्स यांच्यातील ही लढत अतिशय रोमांचक झाली. उपांत्य पूर्व फेरीत पोहचण्यासाठी भारतापुढे आतान्यूजीलंडच्य संघाचं आव्हान आहे. न्यूझीलंड आणि टीम इंडियामद्ये क्रॉस ओवर सामना होणार आहे. कलिंगा स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी शमशेर सिंह आणि आकाशदीप सिंह यांनी गोल केले. ग्रुप डी मध्ये भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तीन सामन्यात दोन विजयासह टीम इंडियानं सात गुणांची कमाई केली आहे.