फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडू मेस्सी-रोनाल्डो पुन्हा एकदा मैदानात मेस्सी पीएसजी संघाकडून तर रोनाल्डो रियाध ऑल स्टार इलेव्हनकडून उतरला मैदानात गुरुवारी सौदी अरेबियातील रियाध शहरात झाला सामना अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मेस्सी, रोनाल्डो आणि एमबाप्पे यांनी गोल केले. रोनाल्डोने दोन गोल केले मात्र त्याचा संघ जिंकू शकला नाही. हा सामना लिओनेल मेस्सीचा संघ पीएसजीच्या बाजूने झुकला. पीएसजीने हा सामना 5-4 च्या फरकाने जिंकला. सामना पाहण्यासाठी रियाधचे स्टेडियम पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले होते. मेस्सी आणि रोनाल्डोला समोरासमोर पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. हे दोन्ही दिग्गज स्टेडियममध्ये दाखल झाले तेव्हा तेथील वातावरण पाहण्यासारखे होते.