भारतीय हॉकी संघाने हॉकी विश्वचषकात आज जपानवर दमदार विजय मिळवला तब्बल 8-0 अशा मोठ्या फरकाने भारताने हा विजय मिळवला आहे. भारतीय संघाला क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे भारताला स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यानंतर आता सुरु वर्गीकरण सामन्यात भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. वर्गीकरण सामने म्हणजे जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांच्यात आता अधिक चांगलं स्थान मिळविण्यासाठी सामने खेळवले जाणार आहेत. आज नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील विजयी संघ पुढे जाऊन नवव्या ते बाराव्या स्थानासाठी सामने खेळणार आहेत. त्याचबरोबर पराभूत संघाला तेराव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळावे लागतील. आज वर्गीकरण सामन्यांच्या सलामीच्या सामन्यात भारतानं जपानवर एकतर्फी विजय मिळवला.