अभिनेता संदीप पाठकने रसिकांसोबत समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे.
कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर पटकावला आहे.
संदीपने मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
'राख'या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी संदीपला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि'लुका हे दोन तगडे अभिनेते होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने संदीप प्रचंड आनंदी झाला आहे.
संदीपच्या नाटकांचे अडीज हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत.
लवकरच संदीपचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.