उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास असेल, तर त्यांनी चहा अजिबात पिऊ नये. उच्च रक्तदाब असलेल्यांला चिंता, तणाव असल्यासही चहा पिऊ नये. कोणत्याही व्यक्तीने रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. त्यांनी चहा प्यायल्यास बीपी वाढण्याची शक्यता असते. जास्त चहा प्यायल्याने छाती आणि पोटात जळजळ होते. रक्तदाब वाढलेला असेल, अशावेळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याची पातळी आणखी वाढू शकते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.