नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे

तिच्या या धाडसासाठी तिला 'टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

8 मार्च रोजी दीपिका पदुकोणने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

दीपिकाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,'मला वाटतं सोमवारची सुरुवात यापेक्षा चांगली असू शकत नाही.

'टाइम 100 इम्पॅक्ट' पुरस्कार जगभरातील निवडक 100 लोकांना प्रदान करण्यात येतो.

दीपिका पदुकोण टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, 2014 मध्ये ती नैराश्याचा सामना करत होती.

या आजारावर मात करण्यासाठी तिच्या आईने तिला मदत केली होती. आजारावर मात केल्यानंतर दीपिकाने नैराश्यग्रस्त रुग्णांनादेखील मदत केली.

त्यासाठी तिने मेंटल हेल्थ फाउंडेशनचीदेखील सुरुवात केली.

'लिव लव लाफ' असे त्या फाउंडेशनचे नाव आहे.