बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने 'अटॅक' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका पत्रकाराला चक्क मूर्ख म्हटले आहे.



या पत्रकाराला अंकल म्हणत डोकं घरी ठेऊन आलात काय? अशा शब्दांत जॉनने सुनावले.



जॉन अलीकडेच त्याच्या आगामी अटॅक या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. त्यावेळी एका पत्रकाराने त्याला त्याच्या चित्रपटातील अवास्तव अॅक्शन सीन्सवर प्रश्न केला,



पत्रकाराने जॉनला विचारले, 'तुझ्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शनचा ओव्हरडोस असतो. बाईक्स उचलून फेकताना आणि हेलिकॉप्टर हातांनी थांबवताना पाहिल्यावर ते एक प्रेक्षक म्हणून पटत नाही.



त्यावर पुन्हा जॉन त्याला म्हणतो, “मला माफ कर” आणि त्याच्या सहकलाकारांकडे वळून पत्रकाराबद्दल टिप्पणी करताना म्हणतो, 'बिचारा, मला वाटते की तो स्वत: खूप निराश आहे.'



सॉरी सर, तुम्ही डोकं घरी ठेवून आलात वाटतं. मी तुमची माफी मागतो. सर्वांच्या वतीने, मी तुमची माफी मागतो. कदाचित पुढच्या वेळी तुम्ही चांगले प्रश्न विचारू शकाल.' यावेळी जॉनने पत्रकाराला ‘अंकल’ असेही म्हटले.