आशियातील सर्वात मोठ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात होत आहे.

जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं दर्शन या टेकफेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे.

विविध राज्यातून, देशातून, विद्यार्थी प्रतिनिधी या टेकफेस्टमध्ये सहभागी झाले आहेत.

यंदाच्या मुंबई आयटी टेकफेस्टचं हे 26 वं वर्ष आहे

आयआयटी टेकफेस्टमध्ये प्रथमच ब्रह्मोस मिसाईलबद्दल माहिती दिली जात आहे.

या टेकफेस्टमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय तो गो 1 विद्युत रोबोट.

इंटरनॅशनल रोबोवॉरमध्ये देश विदेशातून 50 पेक्षा अधिक संघ आले असून साडेबारा लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

विज्ञान तंत्रज्ञानाचा अविष्कार अनुभवायचा असेल तर या आयआयटी टेकफेस्टला नक्की भेट द्या