अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. समंथा रुथ प्रभूने नुकतेच सोशल मीडिया अकाऊंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. समंथाच्या या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे. फोटोमध्ये समंथा ही ऑफ-व्हाइट रंगाच्या ऑर्गेन्झा साडीमध्ये दिसत आहे. सामंथाच्या फ्लोरल थ्रेड एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी आणि प्लंजिंग नेकलाइन ब्लाऊजनं अनेकांचे लक्ष वेधले. इअरिंग्स, स्मोकी आय मेक अप, ग्लॉसी लिप्स अशा लूकमधील समंथाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. समंथानं नेसलेल्या ऑर्गेन्झा साडीची किंमत एक लाख रुपये आहे. समंथा ही सध्या तिच्या ‘शाकुंतलम’ या आगमी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 14 एप्रिल 2023 रोजी समंथाचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समंथाचा 'कुशी' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. समंथा रुथ प्रभूचा चाहता वर्ग मोठा आहे.