भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने काही फोटो शेअर केले आहेत. नेहमी हॉट फोटो टाकणाऱ्या मोनालिसाने पोल्का डॉट साडीमधील फोटो शेअर केलेत. पोल्का डॉट साडी आणि बॅकलेस ब्लाऊज, मोनालिसाचे हे मॅचिंग जबरदस्त आहे. साडीतील फोटोमध्ये मोनालिसा प्रचंड सुंदर दिसत आहे. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. मोनालिसाच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.