'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.
अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये तिचा हॉट अँड बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे. ती कोणताही लूक उत्तमरित्या कॅरी करते.
नवीन फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. डीप नेक शिमरी आऊटफिट, स्लीक बॅक हेअरस्टाईल आणि हॉट रेड लिपस्टिक असा तिचा लूक आहे.
श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते. श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचं चांगलेच कौतुक होत असते.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
अभिनेत्री श्रिया सरनचा 11 सप्टेंबर 1982 रोजी हरिद्वार येथे झाला. ती सध्या 40 वर्षांची आहे. ती अभिनेत्री, मॉडेल आणि कथ्थक डान्सर आहे.
अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 2001 साली आलेल्या 'इश्तम' या तेलुगू चित्रपटातून श्रियाने अभिनयाला सुरुवात केली.
श्रिया सरन अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया यांच्या तुझे मेरी कसम चित्रपटात झळकली होती. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.
'शिवाजी द बॉस' या 2007 साली आलेल्या अभिनेता रजनीकांत यांच्या चित्रपटात झळकल्यामुळे तिला खरी ओळख मिळाली.