प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.



राजकुमारच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात.



नुकताच त्याचा भीड (Bheed Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे



राजकुमार हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी राजकुमार रावला ट्रोल करत आहेत.



राजकुमारनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.



राजकुमारला सिद्धार्थ कनननं घेतलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'



प्रश्नाला उत्तर देत राजकुमार म्हणाला, नाही, 'मी प्लास्टिक सर्जरी केली नाही.'



पुढे राजकुमार म्हणाला, 'अशा अफवा वाचून चेहऱ्यावर हसू येतं. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत हे मला आवडते.'



राजकुमारच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.



राजकुमार रावचा भीड हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.