आज (27 मार्च) राम चरणचा 38 वा वाढदिवस आहे. राम चरणनं दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. राम चरण आणि त्याच्या कुटुंबाची एकूण संपत्ती जवळपास 1300 कोटी आहे. राम चरण हा हैदराबादमधील जुबली हिल्सच्या प्राइम लोकेशनवर असलेल्या एका आलिशान बंगल्यात राहतो. रिपोर्टनुसार, या बंगल्याची किंमत 38 कोटी रुपये आहे. राम चरणकडे तीन कोटींची एस्टन मार्टिन वी8 ही कार आहे. तसेच त्याच्याकडे एक रेंज रोव्हर देखील आहे. राम चरणकडे महागड्या घडाळ्यांचे देखील कलेक्शन आहे. त्याच्याकडे जवळपास 30 घड्याळ आहेत. राम चरणकडे नॉटिलस ब्रँडचे पॅटेक फिलिप नावाचे घड्याळ देखील आहे. या घड्याळाची किंमत 80 लाख रुपये आहे. राम चरण एका चित्रपटासाठी जवळपास 12 कोटी मानधन घेतो. गेम चेंजर या चित्रपटामधून राम चरण प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राम चरणच्या आरआरआर या चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली.