दक्षिण मनोरंजन विश्वातील पॉवर कपल समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य आता वेगळे झाले आहेत.
दोघांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर चाहत्यांना आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती. नागा आणि समंथा वेगळे झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्काच बसला होता.
अलीकडेच समंथाने नागाला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. त्यानंतर दोघेही पुन्हा एकत्र येण्याची चाहत्यांची अपेक्षा आता संपली आहे.
समंथाने तिचा माजी पती नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, पण तरीही ती नागाचा भाऊ अखिल अक्किनेनीला फॉलो करते.
काही काळापूर्वी अशीही बातमी समोर आली होती की, समंथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाला परत केली आहे.
इतकंच नाही, तर दोघं एकत्र येऊ शकतात अशा बातम्याही आल्या होत्या. पण नंतर समंथाने एक वक्तव्य केले आणि ही अफवा असल्याचे म्हटले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, समंथा सध्या तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे
सध्या तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्याचवेळी नागा चैतन्य, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.