बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव हा आपल्या विनोदीशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो.



'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाला या भूमिकेची ऑफर राजपाल यादवला देण्यात आली होती.



पण राजपालनं जेठालाल ही भूमिका साकारण्यास नकार दिला.



राजपाल यांनी जेठालाल ही भूमिका नाकारण्याटचे कारण सांगितले आहे.



राजपाल यांनी सांगितलं की, 'मला अशी भूमिका साकारायला आवडते जी माझ्यासाठी लिहिलेली असते. दुसऱ्यांसाठी लिहिलेल्या भूमिकेमध्ये मला काम करायला आवडत नाही.'



मालिकेतील 'जेठालाल' ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी हे साकारतात.



राजपाल यादव यांच्याबरोबरच एहसान कुरैशी आणि कीकू शारदा यांना देखील जेठालाल या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती.



राजपाल यादव यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते.